Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (2023)

‘अंग गोठवणारी थंडी आणि वाफाळता चहा’ हे एक अजब रसायन आहे. चहा हा अनेकांचा विकपॉंईट असतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन-टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. इतर चहापेक्षा ग्रीन-टी मध्ये अॅंटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात. ग्रीन-टी मधील फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल, इन्झायमी आणि अमिनो अॅसिड तुमच्या मनाला निवांत करतात. ग्रीन टीमुळे तुमची त्वचा नितळ होते, चयापचयाचे कार्य सुधारते. ग्रीन-टीमुळे केवळ तुमचं मनच शांत होतं असे नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते.

काळा चहाचे फायदे ़लोकप्रिय आहेत. जगभरात चहाची निर्मिती सर्वप्रथम चीन आणि मग भारतात झाली. अनेक शतकांपासून चहाच्या गुणकारी गुणधर्मांवर संशोधन करण्यात येत आहे.पण काळ्या चहापेक्षाग्रीन टी हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं पेय आहे.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (1)

ग्रीन-टी ही चहाच्या रोपांवरील अनऑस्किडाईज पानांपासून तयार करण्यात येते. तिच्यामध्ये 20-45 टक्के पॉलिफेनॉल घटक असतात. शिवाय 60-80 टक्के एपिगॅलोकॅटेचिन अथवा EGCG सारखे कॅटेचिन घटकदेखील असतात. केटेचिन हे एक असं अॅंऑक्सिडंट आहे ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. सर्वच ग्रीन-टीमध्ये अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म असतात पण त्यामधील पॉलिफेनॉल हे घटक अधिक फायदेशीर असतात.

ग्रीन-टीचे विविध प्रकार आहेत.चहाची रोपं कशी वाढवली आहेत आणि त्यावर कोणती प्रक्रिया केली आहे किंवा पाने कोणत्या काळात काढली आहेत यावरुन तुम्ही तुमच्या ग्रीन टीची निवड करू शकता.

ADVERTISEMENT

ग्रीन-टीमधील पोषकमुल्यै

ग्रीन-टी आरोग्य लाभ

त्वचेसाठी ग्रीन-टी फायदे

केसांसाठी ग्रीन-टी फायदे

ADVERTISEMENT

जाणून घ्या ग्रीन-टीचे निरनिराळे प्रकार

ग्रीन-टी पाककृती

ग्रीन टीचे दुष्परिणाम

ग्रीन-टी पिणं का गरजेचं आहे? (Why Should You Drink It?)

तुम्ही अगदी नव्याने ग्रीन-टी पिण्यास सुरुवात करताय का…मग ऐक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ग्रीन-टी पिणं तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. कारण ग्रीन-टीमुळे तुम्ही निरोगी होता, तुमची त्वचा नितळ होते आणि तुम्हाला संपूर्ण आरोग्य स्वास्थ लाभते. या शिवाय ग्रीन-टीमध्ये असे बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड्स असतात ज्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. ग्रीन टीमधील हे घटक चहा उकळल्यावर देखील तसेच राहतात ही एक आणखी उत्तम गोष्ट आहे.EGCG हा ग्रीन टीमधील असा महत्वाचा आणि फायदेशीर घटक आहे ज्यामुळे अनेक रोग बरे होतात शिवाय नवीन रोग होण्यापासून बचावदेखील होतो

ADVERTISEMENT

आपण या लेखातून ग्रीन-टी आणि ती घेण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दररोज ग्रीन-टी घेण्यास नक्कीच सुरुवात कराल.

काळ्या चहाच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी देखील वाचा

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (2)

ग्रीन-टी चा इतिहास (History Of Green Tea)

चायनामध्ये मुळ असलेल्या ग्रीन-टीचा शोध ‘सम्राट शेनॉंग’च्या काळात लागला. 600-900 शतकामध्ये ‘लु यु’ या लेखकाने ‘टी क्लासिक’ नावाचं एक पुस्तक ग्रीन टीवर लिहीलं आहे. अर्थात ग्रीन-टी प्राचीन काळापासून एक उत्तम पेय आहे. 1191 मध्ये लेखक ‘झेन पिस्ट इसाई’ यांनी ‘किस्सा योजोकी’ किंवा ‘दी बूक ऑफ टी’ या पुस्तकांमध्ये ग्रीन-टी आपल्या शरीराच्या महत्वाच्या पाच अवयवांवर कशी फायदेशीर ठरते हे लिहून ठेवलं आहे.

ग्रीन-टीमधील पोषकमुल्यै (Nutritional Value in Green Tea)

ग्रीन टीमध्ये एकुण 450 सेंद्रीय घटक असतात. ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी 1, बी 12, के आणि पी सह फ्लोराइड, लोह, मॅग्नेशिअम, कॅलशिअम, स्टॉनीटम, कॉपर, निकेल, झिंक हे घटक ग्रीन टी मध्ये असतात. याशिवाय मोलीब्लेडनम, फॉस्फरस, पोलीफेनॉल, कॅफेन (ज्याला थाईन असंही म्हणतात) टॅनिन (फ्लॅव्हेनॉईड), थिओफिलाइन, थिओब्रोमाइन, फॅट, वॅक्स, सॅपोनिन्स, इसेन्सिअल ऑईल, कॅरोटीन असे विविध घटकदेखील असतात.

ADVERTISEMENT

वाचा –कॅमोमाईल टी चे पोषक तत्व

ग्रीन टीच्या पानांमध्ये असलेल्या या काही पोषकमुल्यांबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

जे घटक काही विशेष बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरतात.

ग्रीन -टीमध्ये असलेलं टॅनिन

टॅनिन हा घटक म्हणजे अगदी साध्या आणि जटील फेनॉल, पोलीफेनॉल आणि फ्लॅव्हेनॉइ़ड या घटकांचा एक समूह असतो. जे तुलनेने पचन आणि फरमेंटेशनसाठी अधिक प्रतिरोधक असतात. फ्लेव्हेनॉईड मुळे तुमचा इनफेक्शनपासून बचाव नक्कीच होतो.

ग्रीन-टीमधील कॅफेन

प्रत्येकी आठ औंस अथवा 230 मिली चहामध्ये 30 ते 50 मिली कॅफेनचा घटक असतो. ग्रीन-टीमध्ये कॅफेनचे प्रमाण किती असावे हे पूर्णपणे चहाचे उत्पादन व रोपांची वाढ कोणत्या विभागात झाली आहे यावर अवलंबून असू शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास कोवळी पाने व कळ्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅफेन असू शकते तर ग्रीन-टीच्या जुन पानांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात कॅफेन असते. जर तुम्हाला ग्रीन-टीमधील कॅफेनच्या दुष्परिणामांविषयी चिंता वाटत असेल. तर मुळीच काळजी करू नका कारण ग्रीन-टी मधील EGCG आणि थेनिन या दुष्परिणामानां दूर ठेवते. थोडक्यात ग्रीन-टी हे एक सुरक्षित पेयं आहे.

व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर घटक

कॅलरीजचे प्रमाण अगदी शुन्य असलेली ग्रीन-टी ही मिनरल्स आणि व्हिटॅमिनचा एक चांगला स्रोत आहे. ग्रीन-टीमधील व्हिटॅमिन सी चं प्रमाण एखाद्या लिंबाप्रमाणे कार्य करतं. त्यातील व्हिटॅमिन बी पाण्यामध्ये त्वरीत विरघळतं आणि चहामध्ये मिसळतं. ज्यामुळे तुमच्या शरीराला सहज व्हिटॅमिन्स मिळु शकतात.

ग्रीन-टी तुमच्या शरीरासाठी कश्या प्रकारे फायदेशीर ठरते हे अवश्य वाचा (Ways Green Tea Is Beneficial For Your Health)

1. रक्तदाब नियंत्रणात आणते- रक्तदाब हा सामान्यपणे मूत्रपिंडातील angiotensin-converting enzyme ( ACE) मुळे होतो. ग्रीन-टीमुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो व पर्यांयाने तुमचा रक्तदाब देखील नियंत्रित राहतो.

2. टाईप 2 डायबेटिज चा धोका कमी होतो- आजकाल टाईप 2 मधूमेह चे प्रमाण फारच वाढले आहे. तुमच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास अथवा तुमच्या शरीराने इन्सुलीनच्या निर्मितीचे कार्य थांबविल्यास तुम्हाला टाईप 2 मधूमेह होण्याची शक्यता असते. एका कोरीयन संशोधनानूसार दररोज सहा किंवा त्याहुन अधिक ग्रीन-टी घेतल्यास तुम्हाला टाईप 2 मधूमेह होण्याची शक्यता 33 टक्क्यांनी कमी होते. मात्र यासाठी किती प्रमाणात ग्रीन-टी घ्यावी हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसारच ठरवा.

ADVERTISEMENT

3. दररोज अॅंटीऑक्सिडंटचा पुरवठा होतो- ग्रीन-टीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यांचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा वाढल्याने पेशींचे पोषण होते आणि नुकसान आपोआप कमी होते. ग्रीन-टी पिण्याऱ्या लोकांना ह्रदयरोग होण्याचा धोका 31 टक्क्यांनी कमी असतो असे आढळले आहे.

वाचा –Health Benefits Of Mint Leaves In Marathi

4. कर्करोगाचा धोका कमी होतो- जेव्हा शरीरातील रोगाच्या पेशी अनियंत्रित प्रमाणात वाढतात तेव्हा कर्करोगाचा धोका वाढतो. ग्रीन-टीमध्ये कॅटेचिनसारखे अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे पोटाचा कॅन्सरची लक्षणे (Stomach Cancer Symptoms In Marathi) असो वा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असो. त्यापासून तुमचा बचाव होतो. ग्रीन-टीमधील कॅटेचिन पेशींमधील प्रतिक्रियात्मक ऑक्सिजन प्रजातींमुळे होणा-या DNA चे नुकसान रोखते. त्याचप्रमाणे ग्रीन-टीमधील पॉलिफेनॉल शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते.

वाचा – Low Platelets Symptoms, Causes And Home Remedies

ADVERTISEMENT

5. वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते-तुम्हाला हे नक्कीच माहित असेल की ग्रीन-टीमुळे चयापचयाचे कार्य सुधारते व फॅट्स बर्न होतात. ज्यामुळे सहाजिकच वजन आपोआप कमी होते. काही संशोधनानूसार व्यायामासोबत ग्रीन-टी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सामान्यपणे पोट कमी करण्यासाठी ग्रीन-टी फारच फायदेशीर आहे.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (3)

6. आर्थ्राटिसमध्ये आराम मिळतो- शंभराहून अधिकवेळा हे सिद्ध झाले आहे की ग्रीन-टी व्हिटॅमिन सी अथवा ई पेक्षाही अधिक प्रभावी आहे.सहाजिकच आर्थ्राटिसमध्ये ग्रीन-टी मधील अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म अधिक फायदेशीर ठरतात.

7. दीर्घायुष्य प्रदान करते– ग्रीन-टी ह्रदयविकार व कर्करोगावर फायदेशीर असते. ज्यामुळे तुमचे आयुष्य वाढू शकते. स्टॅनफोर्डमधील एका संशोधनानूसार ग्रीन-टी घेणाऱ्या लोकांमध्ये वयोमानानूसार येणाऱ्या समस्या कमी उद्भवतात. कार्यक्षमता कमी न झाल्याने तुम्ही निरोगी राहता व तुम्हाला दीर्घायुष्य लाभते.

8. रोग प्रतिकारशक्ती वाढते- ग्रीन-टीमधील कॅटेचिन व EGCG मध्ये नियामक टी-पेशी वाढविण्याची क्षमता अधिक असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही कमी आजारी पडता.

ADVERTISEMENT

9. मेंदूचे कार्य सुधारते- ग्रीन-टीमधील कॅफेन तुम्हाला सक्रिय ठेवण्यासोबत बऱ्याच गोष्टींसाठी मदत करते. कॅफेन मेंदूच्या पेशींना उत्तेजित करते. ज्यामुळे तुमचे मेंदूचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते, मुड सुधारतो व तुमचे विचार सक्रिय होतात. कॅफेनमुळे अॅडोनोसाईन ही क्रिया बंद होते, ज्यामुळे मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर कार्यात सुधारणा होऊन मेंदूचे कार्य वाढते.

10. पचनक्रिया सुधारते- ग्रीन-टी हे एक पाचक पेय आहे. ग्रीन-टीमधील कॅटेचिनमुळे तुमच्या पचनक्रियेतील अडथळे दूर होतात. ज्यामुळे अन्न पोट व आतड्यांमध्ये अडकून राहत नाही.

11. दातांच्या समस्येपासून बचाव होतो- ग्रीन-टी प्यायल्याने तुमच्या दातांमध्ये जंतूसंसर्ग कमी प्रमाणात होतो. ग्रीन-टी मधील पॉलिफेनॉल दातांचे जंतूपासून संरक्षण करते. ज्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य सुधारते.

12. डिप्रेशनच्या उपचारांमध्ये मदत करते- एका संशोधनानूसार जे लोक दररोज चार कप ग्रीन-टी घेतात त्यांना नैराश्याची समस्या कमी प्रमाणात होते. ग्रीन-टीमधील amino acid L-theanine सेरोटोनिन या केमिकलला उत्तेजित करतात. ज्यामुळे नैराश्यावर मात करणे सोपे जाते.

ADVERTISEMENT

13. डाऊन सिन्ड्रोमवर उपचार करते- डाऊन सिन्ड्रोम हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती दोन गुणसुूत्रांऐवजी 21 गुणसूत्रांसह जन्माला येते. ज्या लोकांना डाऊन सिन्ड्रोम असतो त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये शारीरिक व मानसिक अक्षमता असतात. संशोधनानूसार ग्रीन-टीमधील ECGG मुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते ज्यामुळे प्राथमिक स्थितीतील रोगात सुधारणा करणे सोपे जाते.

14. हॅंगओव्हर कमी होतो- हो…हो… तुम्ही बरोबर ऐकलं आहे. ग्रीन-टीमध्ये अॅंटिऑक्सिडंट असतात त्यामुळे तुमचे यकृत डिटॉक्स होते व तुम्हाला हॅंगओव्हरपासून मुक्तता मिळते. पण असं असले तरी अशा स्थितीत आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण काही केसेसमध्ये याचा यकृतावर दूष्परिणाम देखील होण्याची शक्यता असते.

15. उर्जा आणि सहनशक्ती वाढते- ग्रीन-टीमधील कॅटेचिनमुळे तुमच्या शरीरातील उर्जा आणि सहनशक्ती वाढू लागते. ज्यांना काम करताना कंटाळा घालविण्यासाठी अथवा फ्रेश वाटण्यासाठी कॉफी घ्यावी असे वाटत असेल त्यांनी कॉफीऐवजी ग्रीन-टी घेण्यास काहीच हरकत नाही.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (4)

त्वचेवर ग्रीन-टीचे हे ‘7’ चांगले फायदे होतात (Green Tea For Skin)

जर तुम्हाला ग्रीन-टीची चव आवडत नसेल तर मुळीच काळजी करू नका. कारण ग्रीन-टी तुमच्या शरीराप्रमाणेच तुमच्या त्वचेवर देखील तितकीच फायदेशीर ठरते. ग्रीन-टीच्या पानांची पेस्ट तुम्ही तुमच्या त्वचेवर देखील लावू शकता.यासाठी ग्रीन-टीचे हे सौदर्य फायदे देखील अवश्य वाचा.

ADVERTISEMENT

1. पफी आईज आणि डार्क सर्कल्सवर उपयुक्त आहे

तुम्हाला माहित आहे का ? ग्रीन-टीमधील अॅंटिऑक्सिडंट आणि टॅनिन तुमच्या डोळ्याखालील त्वचेतील रक्तवाहिन्या संकुचित करते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या त्वचेवरील सूजलेला अथवा फुगलेला भाग कमी होतो. तसेच ग्रीन-टीमधील व्हिटॅमिन के तुमच्या डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळंदेखील कमी करतात. यासाठी दोन ग्रीन-टी बॅग अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेल्या ग्रीन-टी बॅग अर्धातास डोळ्यांवर ठेवा आणि आराम करा. आठवड्यातून एकदा असे करण्याची सवय स्वतःला लावा.

2. तुमची त्वचा अधिक तरुण व चमकदार होते.

जेव्हा मला कोणीतरी तू तिशीची असूनही विशीची कशी दिसतेस असं विचारतं तेव्हा मी याचं श्रेय ग्रीन-टीला देते. ग्रीन-टीमध्ये अॅंटिएजींग आणि अॅंटिऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे तुमची सैल झालेली त्वचा, चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, फाईन लाईन्स दूर होतात. तुम्ही अधिक तरुण आणि तजेलदार दिसू लागता. मी ग्रीन-टीच्या पावडर मध्ये पाणी घालून छान पेस्ट तयार करते आणि त्यामध्ये काही नारळाच्या तेलाचे काही थेंबदेखील घालते. या सर्व घटकांना चांगलं मिक्स करुन मग त्याचा फेस माक्स चेहऱ्यावर लावते. त्यानंतर जवळजवळ वीस मिनीटं चेहऱ्यावर हा मास्क ठेवून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करते.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (5)

3. तुमची त्वचा नितळ होते.

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स अथवा मुरमं असतील तर ग्रीन-टी तुमच्यासाठी वरदान ठरु शकते. ग्रीन-टीच्या पानांमध्ये कॅचेटीन मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमचा हॉर्मोनल बॅलन्स नियंत्रित राहतो. तुमचे हॉमोन्स नियंत्रित असल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या देखील आपोआप दूर होते. यासाठी तुमच्या पिंपल्सवर थंड पाण्यामध्ये गरम ग्रीन-टी मिसळा आणि लावा. एका कापसाच्या छोट्या गोळ्यावर हे मिश्रण घेऊन तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्नेवर ते लावा. पंधरा ते वीस मिनीट झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. महिन्यातून कमीत कमी दोन ते तीनवेळा हे करुन बघा.

4. ग्रीन-टी तुम्ही एक नैसर्गिक टोनर म्हणून देखील वापरु शकता.

मुलींनो, जर तुमची त्वचा नितळ आणि चमकदार नसेल तर मुळीच चिंता करु नका. यासाठी आता पार्लरमध्ये वायफळ खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त ग्रीन-टीने तुमचा चेहरा स्वच्छ करा. आता बघा… तुमचा चेहरा कसा नितळ दिसू लागेल. कारण ग्रीन-टीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाते. त्वचेची छिद्रं मोकळी होतात. सहाजिकच तुम्ही आणखी सुंदर दिसू लागता.

ADVERTISEMENT

5. तुमच्या त्वचेचे कॉम्लेक्शन सुधारते.

ग्रीन-टीमुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार होते. कारण ग्रीन-टी तुमच्या चेहऱ्यावरील काळे चट्टे दूर करते. यासाठी तुम्ही एक कप ग्रीन-टी सेवन शकता अथवा ग्रीन-टीच्या पानांची एक कोरडी पावडर तयार करुन ठेवा. या पावडरमध्ये मध आणि लिंबाचा रस टाकून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट् चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनीटे हा पॅक सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा आणि टॉवेलने हळुवारपणे चेहरा टिपून घ्या.

6. तेलकट त्वचेपासून बचाव होतो.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्यासाठी ग्रीन-टी फारच फायदेशीर आहे. कारण ग्रीन-टीमध्ये टॅनिन असतं. ज्यामुळे त्वचेतील तेलनिर्मिती रोखली जाते. नियमित ग्रीन-टी घेतल्याने तुमच्या त्वचेचा बॅलन्स उत्तम राहतो. तुमची त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसू लागते.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (6)

7. ग्रीन-टी एक नैसर्गिक सन प्रोटेक्टर देखील आहे.

त्वचेतील दाह कमी होण्यासाठी काही सौदर्य प्रसाधनांमध्ये ग्रीन-टीचा वापर केला जातो. ज्यामुळे सुर्यप्रकाशापासून तुमची त्वचा सुरक्षित राहू शकते. ग्रीन-टीमुळे रॅशेस व सनबर्नचा त्रास होत नाही. अशा उत्पादनांमध्ये असलेल्या ग्रीन-टीमधील घटक तुमच्या त्वचेला ओलसर व पोषक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळतो.

8. तुमच्या केसांसाठी देखील उपयुक्त ठरते.

कदाचित तुमच्यापैकी काहींना हे माहित नसेल की ग्रीन-टीमधील कॅचेटिनमध्ये अल्फा रिडक्टेज घटक असतात ज्यामुळे तुमचे केस गळणं कमी होतं. तुम्ही तुमचे केस महिन्यातून एकदा थंड पाण्यात ग्रीन-टी टाकून धुवा. दिवसभरात दोन ते तीन कप ग्रीन-टी घेणंदेखील यासाठी फायदेशीर ठरेल. ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहतील.

ADVERTISEMENT

ग्रीन-टी तुमच्या केसांसाठी कशी उपयुक्त आहे (Green Tea For Hair)

ग्रीन-टी तुमच्या केसांच्या वाढीला उत्तेजित करते शिवाय त्यामुळे तुमच्या केसांचा पोतदेखील सुधारतो. ग्रीान टीमुळे DHT (Dihydrotestosterone) च्या वाढीला प्रतिरोध होतो. खरंतर DHT ची वाढ झाल्यास केसांची वाढ खुंटते आणि केस गळू लागतात. ग्रीन-टीमधील घटक टेस्टोस्टेरॉनला सक्रिय करून त्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. ग्रीन-टीमधील अॅंटिसेप्टीक घटक केसांमधील कोंडाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.ग्रीन टीमधील पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन ई,सी या घटकांमुळे केसगळती थांबल्यामुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या कमी होते. अर्धा लीटर पाण्यामध्ये तीन ते चार ग्रीन-टी बॅग टाका. केसांना शॅम्पू आणि कंडीशनर केल्यावर या पाण्याने केस धुवून काढा.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (7)

ग्रीन-टीचे तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसून येतील. पण ग्रीन-टीचा वापर करण्याआधी थोडं थांबा कारण ग्रीन-टीचे अनेक प्रकार आहेत.जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

जाणून घ्या ग्रीन-टीचे निरनिराळे प्रकार (Different Type Of Green Tea)

1. सेन्चा ग्रीन टी(Sencha green tea)

सेन्चा ही एक जपानी ग्रीन टी असून जगभरात ही चहा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. ही ग्रीन-टी तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. या पद्धतीमध्ये पाने उकळवून घेतली जातात आणि रोल करुन क्रूड टी तयार केली जाते.

2. जेनमायचा ग्रीन टी (Genmaicha green tea)

जपानमध्ये जेनमायचा हा शब्द ब्राऊन राईससाठी वापरण्यात येतो. हा चहा भातापासून तयार करण्यात येतो. ब्राऊन राईस धुवून भिजवतात, उकडतात त्यानंंतर रोस्ट करुन टॉस केला जातो. त्यानंतर तो सेन्चा ग्रीन-टीमध्ये किंवा समप्रमाणात मिक्स केला जातो. ज्यामधून जेनमायचा ग्रीन-टी तयार होते. जेनमायचा ग्रीन-टीमध्ये कॅफेनचं प्रमाण कमी असल्यामुळे हा चहा लहान मुलं आणि वयोवृद्धासाठी चांगला असतो.

ADVERTISEMENT

3. होजिचा ग्रीन-टी (Hojicha green tea)

ही ग्रीन-टी सेन्चा ग्रीन टीला रोस्ट करुन तयार करण्यात येते ज्यामुळे त्याला एक छान अॅरोमा येतो. यासाठी ग्रीन टीची पाने 200 अंश सेल्सियसवर रोस्टींग पॅनवर गरम केली जातात व लगेच थंड करण्यात येतात. रोस्ट केल्यामुळे चहाच्या पानांमधील कॅफेनचे रुंपातर (घनस्वरुपातून वायूस्वरुपात) होतं. ज्यामुळे चहा थोडासा कडवट लागू शकतो. म्हणूनच हा चहा लहानमुलं आणि वयोवृद्ध जास्त पसंत करतात. होजीचा ग्रीन-टी ही तिच्या अरोमा आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे.

4. ग्योकुरो ग्रीन-टी (Gyokuro green tea)

ग्योकुरो ग्रीन-टी तयार करण्यासाठी चहाच्या रोपांना वीस दिवस कापडाने अथवा Reed screen ने झाकून ठेवलं जातं. ज्यामुळे रोपं वाढताना त्यांना कमी प्रमाणात सुर्यप्रकाश मिळतो. ज्यामुळे ग्रीन टीमधील केचॅटीन आणि अमिनो अॅसिड (theanine) ची प्रक्रिया दाबली जाते. हा चहा स्वादिष्ट तर होतोच शिवाय त्यामुळे उष्माघाताचा त्रास देखील होत नाही.

5. मॅचा ग्रीन-टी (Matcha green tea)

मॅचा ग्रीन टी ही विशिष्ठ पद्धतीने वाढवलेली आणि प्रक्रिया केलेल्या चहाच्या पानांना दगडावर वाटून तयार केलेली चहा पावडर आहे. जपानमधील पारंपरिक टी सेरीमनीमध्ये डार्क Matcha (Koicha) वापरण्यात येते. शंभर वर्ष जुन्या चहाच्या रोपांपासून हा चहा तयार करण्यात येतो. जगप्रसिद्ध मॅचा टी केकसारख्या पारंपरिक आणि गोड पदार्थांमध्ये वारपण्यात येते. Starbucks सारख्या अनेक कॉफी शॉपध्ये ही ग्रीन टी उपलब्ध असते.

तुम्ही ग्रीन टी कुठे विकत घेऊ शकता? (Where Can You Buy Green Tea)

Amazon, Flipkart आणि Nature’s Basket सारख्या ऑनलाईन शॉपिंगसेंटरवर तुम्हाला ग्रीन टी सहज उपलब्ध असते.

ADVERTISEMENT

तसंच या सर्वोत्तम ग्रीन टी पैकी तुम्ही कोणतीही ग्रीन टी निवडू शकता.

1. Lipton Green Tea Bags – Honey Lemon ( किंमत 138)

2. Typhoo Green Tea – Lime & Lemon Flavoured (किंमत 130)

3. Goodwyn Assorted Box, 20 नग (किंमत 540)

ADVERTISEMENT

4. KimiNo Japanese Organic Matcha Green Tea Powder With Free Recipe Ebook (किंमत 499)

5. Eden Foods, Organic Hojicha, Roasted Green Tea (किंमत 336)

ग्रीन टी हे एक उत्तम पेय तर आहेच शिवाय ते तुमच्या शरीर आणि त्वचेसाठीदेखील गुणकारी आहे. आम्ही तुम्हाला काही सौदर्यउत्पादनांची यादी देत आहोत ज्यामध्ये ग्रीन टीचे घटक असतात.

1.दी बॉडी शॉप जॅपनीस मॅचा टी पॉल्युशन क्लिअरींग मास्क (The Body Shop Japanese Matcha Tea Pollution Clearing Mask)किंमत 1895

ADVERTISEMENT

2.एनवायएक्स प्रोफेशनल मेकअप ग्रीन टी ब्लोटींग पेपर (NYX Professional Makeup Green Tea Blotting Paper– किंमत 500

3.इनीसफ्री ग्रीन टी मिंट फ्रेश शॅम्पू (Innisfree Green Tea Mint Fresh Shampoo) किंमत 650

4.प्लम ग्रीन टी क्लिअर फेस मास्क (Plum Green Tea Clear Face Mask)किंमत 417

4.डिअरपॅकर होम रेमेडी मास्क (DearPacker Home Remedy Mask – Green Tea + Jasmine Flower)किंमत 100

ADVERTISEMENT

घरीच ग्रीन टी कशी तयार कराल? (Green Tea Recipe)

जर तुम्हाला घरी ग्रीन टी तयार करायची असेल तर तुम्हाला या पद्धतीने ती करणे खूप सोपं जाईल. यासाठी तुम्ही आपण ज्याप्रमाणे बिनदूधाचा चहा करतो अगदी तशीच ग्रीन टी तयार करू शकता. तुमच्या गरजेनूसार दोन कप पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यावर भांड्यामध्ये ग्रीन टीची पाने टाका. थोडा वेळ मंद गॅसवर चहा उकळू द्या. नंतर गाळणीने चहा गाळून घ्या.

पाणी उकळून घेऊन ग्रीन टीची पाने गाळणीत ठेवून त्या गाळणीत पाणी गाळूनदेखील तुम्ही ग्रीन टी तयार करू शकता.

जर तुम्ही ग्रीन टी बॅगचा वापर करुन चहा करणार असाल तर कपमध्ये एक ग्रीन-टी बॅग घ्या आणि वरुन गरम पाणी टाका. तुमचा ग्रीन टी तयार आहे.

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (8)

ग्रीन टी बाबत बरंच काही… (Facts About Green Tea)

  • जरी ग्रीन टीची पाळंमुळं चीनमध्ये रुजलेली असली तरी ग्रीन टी आता अनेक आशियायी देशात आणि पर्यांयाने जगात पोहचली आहे.
  • ग्रीन टीचा शोध सम्राट शेनॉंगच्या काळात इ.स. पूर्व 2737 मध्ये लागला
  • ग्रीन चीच्या प्रत्येकी 100 मिलीमध्ये 99.9 टक्के पाणी आणि एक कॅलरी असते.

ग्रीन टीचे दुष्परिणाम (Side Effects Of Green Tea)

कोणतीही गोष्ट जर अतिप्रमाणात अथवा योग्य प्रमाणात नाही घेतली तर त्या गोष्टींचे दुष्परिणाम होणं हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे ग्रीन टीदेखील अतिप्रमाणात सेवन केल्यास तिचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

ADVERTISEMENT

अतिप्रमाणात सेवन केल्याची लक्षणे

ग्रीन टी दिवसभरात चार ते सहा कपांपेक्षा जास्त घेणे म्हणजे ग्रीन टीचे अतिसेवन करणे होय. ज्याच्या परिणांमुळे डोकेदुखी, नैराश्य, अतिझोप येणं, उलटी, मळमळ, ह्रदयाचे ठोके अनियमित होणं, चक्कर आणि आळस अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. ग्रीन टीचे दुष्परिणाम त्यामधील कॅफेन या घटकामुळे दिसून येतात. लहान मुलांनी जर अतिप्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर हे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू शकतात.

प्रेग्नसी आणि ब्रेस्टफिडींगमध्ये समस्या येतात

गरोदर असताना अथवा स्तनपानाच्या काळात दोन पेक्षा अधिक ग्रीन टी चे सेवन करू नये. कारण असे करणे धोक्याचे असू शकते. अशा वेळी ग्रीन टी किती प्रमाणात घ्यावी यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रक्तासंबधी विकार असल्यास

ग्रीन टीमधील कॅफेनमुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला रक्तासंबधी विकार असतील तर ग्रीन टी न घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

डोळ्यांच्या समस्या

अतिप्रमाणात ग्रीन टी घेतल्यास डोळ्यांवर ताण येतो. जर तुम्हाला डोळ्यांच्या समस्या असतील तर तुम्ही ग्रीन टी पासून दूर राहायला हवे.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य-Shutterstock

You Might Like These:

ADVERTISEMENT

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Domingo Moore

Last Updated: 16/12/2023

Views: 6142

Rating: 4.2 / 5 (73 voted)

Reviews: 80% of readers found this page helpful

Author information

Name: Domingo Moore

Birthday: 1997-05-20

Address: 6485 Kohler Route, Antonioton, VT 77375-0299

Phone: +3213869077934

Job: Sales Analyst

Hobby: Kayaking, Roller skating, Cabaret, Rugby, Homebrewing, Creative writing, amateur radio

Introduction: My name is Domingo Moore, I am a attractive, gorgeous, funny, jolly, spotless, nice, fantastic person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.